अकोला: भरधाव ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थींनीस उडविले

विद्यार्थींनी गंभीर जखमी : ट्रकचालक ताब्यात

निज़ाम साजिद

अकोला : भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीस चिरडल्याची घटना २० डिसेंबर रोजी घडली. यामध्ये विद्यार्थींनीचा गंभीर जखमी झाली असून तीला खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल रामभाउ ढोरे रा. चतारी यांची पुतणी शिवाणी सुभाष ढोरे २० ही श्री शिवाजी महाविद्यालयात जात होती. यावेळी एम ए ३० एल ३१३७ क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने तीला चिरडले. यामध्ये विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्याने तीला खाजगी रूग्णालयात तात्काळ उपचारार्थ भरती करण्यात आले. याप्रकरणी ढोरे यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालक अब्दुल सय्यद अब्दूल हारूण रा. अकोट यास अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading