अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर!

नवी दिल्ली – सध्याचं युग हे अँड्रॉईडचं युग आहे. त्यामुळेच अँड्रॉईडचे युजर्सही मोठ्या संख्येने असलेले पाहायला मिळतात. अँड्रॉईड यूजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. गुगलने डेटा लीक आणि हॅकींगपासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी डेव्हलपर्ससाठी एक कठोर गाईडलाईन तयार केली आहे. ही पॉलिसी प्रामुख्याने प्ले स्टोरसाठी आहे. केवळ डिफॉल्ट अॅपला कॉल आणि मेसेज पाठवण्याची परवानगी असणार आहे. अँड्रॉईड अॅप डेव्हलपर्सना अॅप अपडेट करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. याआधी पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलनेगुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा केल्याने युजर्सला धक्का बसला होता. गुगलने SMS Retriever API, SMS Intent API आणि Share Intent API, Dial Intent API या सर्विसना कॉल, मेसेज आणि कॉल लॉगच्या अॅक्सेसची परवानगी दिली आहे.

News by lokmat. com

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading