नांदेड – शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका चारचाकी गाडीमध्ये घातक शस्त्र आढळले. यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी सदरची चारचाकी वाहन ताब्यात घेतले.वाहन (क्रमांक एमएच २८ व्ही ९७६२) ही चारचाकी रस्त्यावर फिरत असताना पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांना माहिती प्राप्त झाली की, या गाडीत धारदार शस्त्र आहेत. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तपासणी केली असताना या गाडीत तलवार हे धारदार शस्त्र सापडले. पोलिसांनी या गाडीतील युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दखल होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले युवक कोण आहेत. त्यांचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.