नांदेड/प्रतिनिधी-सोलापूर रेल्वे डिव्हीजनच्यावतीने चालविण्यात येणारी पुणे-निझामाबाद-पंढरपूर (गाडी क्र.51433) ही पँसेजर रेल्वे मेंटनसच्या नावाखाली मागील सहा महिन्यांपासून बंद ठेवली होती. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार डॉ.एस.एस.जाधव यांनी रेल्वे विभागाचे लक्ष वेधून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेवून रेल्वे विभागाने सदरील गाडी 1 ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरु केली आहे. प्रदीर्घ काळ धर्माबाद-नांदेड अपडाउन करणार्या ज्येष्ठ पत्रकार जाधव यांनी या बाबतीत रेल्वे विभागाच्या टिट्वरवर वारंवार तक्रारी केल्या होत्या. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनीही जाधव यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवुन ही गाडी सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जाधव यांच्या टिट्वरची दखल घेत सोलापूर रेल्वे विभागाने ही गाडी 1 ऑक्टोबरपासून सुरु करीत असल्याचे प्रा.डॉ.जाधव यांना टिट्वरवरुनच कळविले होते.