नाशिकः राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र याबाबत खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
मी शिवसेनेत प्रवेश करणार नाही, या बातम्या निव्वळ अफवा आहेत. असे म्हणत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या प्रवेशाचं खंडन केलं. आज येवल्यात भुजबळांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्प जलपूजन करण्यात येत आहे, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीही फेटाळून लावलं आहे. ते म्हणाले, आम्ही आता खूप पुढे निघून आलोय. मलाही मेसेज आला. मात्र हे तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले.
The post शिवसेना प्रवेशाची बातमी ही निव्वळ अफवा; छगन भुजबळांचा खुलासा appeared first on Maharashtra Today.