रस्त्यावरील खड्डे शोधणारे अ‍ॅप विद्यार्थ्यांनी तयार केले

मुंबई : महाराष्ट्रातील रस्त्यांवर खड्डे दाखवा बक्षीस मिळवा, अशी घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही शहरात वाहनचालकाची खड्ड्यांतून मुक्ती झालेली नाही. प्रशासनाला हे खड्डे दिसत नसतील, तर आता त्याचा अ‍ॅलर्ट डायरेक्ट तुम्हीही देऊ शकणार आहात. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तसे अ‍ॅप तयार केले असून, ते अ‍ॅप रस्त्यावरील खड्डेच शोधून काढणार आहे.आयआयटीच्या सेंटर आॅफ स्टडिज इन रिसोर्स इंजिनीअरिंग या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे अ‍ॅप टेकफेस्टमध्ये सादर करण्यात आले आहे. अ‍ॅपमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला खड्डे आॅन द स्पॉट दाखवणे सोपे होईल. शिवाय कुठे खड्डा आहे ते देखील शोधता येईल. खड्ड्यांची तीव्रता, खोलीही मोजता येईल, अशी माहिती हे अभिषेक पोतनीस या विद्यार्थ्याने दिली.

अ‍ॅप पूर्णत: तयार असले तरी ते मुंबईकरांना वापरासाठी देण्यापूर्वी आयआयटीच्या या टीमला पालिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. या अ‍ॅपसंदर्भात प्राध्यापक सूर्य दुर्भा आणि विद्यार्थ्यांची पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासोबत बैठक झाली असून पुढील कार्यवाही लवकरच होईल, अशी अपेक्षा प्रा. दुर्भा यांनी व्यक्त केली.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading