अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले . पवार म्हणाले, नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक ४ किंवा ५ जानेवारी २०१९ होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात असल्याचे पवार म्हणाले. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जाहीर युती दिसून आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाठींबा देण्याचा निर्णय माझा व नगरसेवकांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी काल जाहीर केले होते