मुंबई | फेमिना मासिकाच्या पृष्ठ पानावर फोटो छापून येणे बॉलिवूड अभिनेत्रींसाठी मानाची बाब असते. ऑक्टोबर महिन्याच्या फेमिना कव्हरपेजवर चक्क मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो आहे.आपल्यातील सगळेच जण भारी काही करतील असे नाही, पण आपण लहान गोष्टी ही भरपूर प्रेमाने करु शकतो, असं ट्वीट अमृता यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी फेमिनाच्या कव्हरपेजचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता यांनी काळ्या रंगाचा मॉर्डन गाऊन परिधान केला आहे. त्यात त्या फारच सुंदरही दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वी 2016 मध्ये सॅव्ही मासिकाच्या कव्हर पेजवर अमृता यांचा फोटो छापण्यात आला होता. तेव्हा त्या मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.