प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 नांदेड,दि. 27:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी भारतीय वायू दलाच्या विमानाने दिल्लीहून नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड , विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदि मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. नांदेड विमानतळावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने तेलंगणा राज्यातील निजामाबादकडे प्रयाण झाले.

اپنی رائے یہاں لکھیں