पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याची योजना उधळली, तिघेजण शस्त्रासह ताब्यात

नांदेड – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ८ पैकी ३ आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. उर्वरित ५ आरोपी अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा एका आंतरराज्यीय फरार आरोपीशी संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून, या आरोपीकडून ३ अग्निशस्त्रे, ६ जिवंत काडतूसे, १ एअर पिस्तूल व धारदार खंजीर जप्त करण्यात आली आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे १ फिरते पथक पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या नेतृत्वात फिरत असताना मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना हत्यारांची तस्करी करणाऱ्या व दरोडे टाकणाऱ्या एका टोळीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री बारा वाजण्याच्यानंतर मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानाजवळ १ टोयाटो कार (क्र.एमएच-०६-टी-८९१६) आढळून आली. कारच्या बाजूस अंधारात दबा धरुन ५ आरोपी बसले होते. त्यापैकी जगदीशसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू (रा.भगतसिंह रोड, नांदेड), करणसिंघ उर्फ किरण किन्हासिंघ बावरी (रा.संत गाडगेबाबा नगर, कौठा नांदेड), राहूल सुभाष ठाकूर (रा.सांगवी) यांना पोलीसांनी पकडले. त्यांची व गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ एअर पिस्तूल, ६ जिवंत काडतूस, १ बारा बोअर रायफल, २ गावठी कट्टे, १ खंजीर आढळून आले. यातील आणखी ५ आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांची टोयाटो कोरोला कारदेखील पोलिसांनी जप्त केली. एखादा दरोडा टाकण्याच्या तयारीत ते असल्याचे आढळून आले. या सर्व आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading