अर्धापुर ( शेख जुबेर ) अर्धापुर तालुक्यातील पार्डी ( म ) येथील लोकमतचे प्रतिनिधी व वृत्तपत्र विक्रेते युनूसमिया नदाफ यांची पान ठेल्याची दुकान अज्ञात व्यक्तीकडून फोडून २२ हजारांचे साहित्य लंपास केले आहे
नांदेड – नागपूर मार्गवरील पार्डी ( म ) पाटीवर पान ठेल्याची दुकान असून ते वृत्तपत्र विक्रते आहेत दि .१० रोजी अज्ञात व्यक्तींनी रात्रीला पान ठेला फोडून त्या मधील वस्तू लंपास केल्या आहेत यामध्ये चिल्लर ठेवलेला डबा अंदाजे पाच ते सहा हजार रुपये व अन्य वस्तू असा मिळून अंदाजे ९ हजारांचे साहित्य लंपास केले आहे.
ऐका वर्षातील ही दुसरी घटना असून पहिला वेळेस ही दहा ते पंधरा हजारांचे साहित्य केले होते. काल रात्री दि.१० रोजी अज्ञात चोरट्यांनी कडी तोडून पान ठेवल्याचे दुकान फोडले यावेळी ९ हजाराचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. एका वर्षात दोन वेळा झालेल्या चोऱ्यांमध्ये अंदाजे २३ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या चोऱ्यांमुळे परिसरातील व्यवसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त लावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
