नवी मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपत जाण्याचे लोण आता महापालिकेपर्यंत पोहोचले आहे. नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 52 नगरसेवक हे राजीनामा देऊन भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई मनपामध्ये आता काँग्रेसची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे भाजपमध्ये होणारे हे पक्षांतर जरी स्थानिक वाटत असले तरी त्यामागे विधानसभा निवडणुकीची गणितं असल्याची चर्चा आहे. संदीप नाईक हे भाजपच्या वाटेवर असून त्यांचे वडील गणेश नाईक यांनाही भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरला आहे. आज नवी मुंबई येथे संदीप नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली. बैठकीला जिल्हाध्यक्ष अनंतर सुतार उपस्थित होते.
The post नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर appeared first on Maharashtra Today.