मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसैनिकांच्या उपस्थितीत अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. एका प्रश्नाच्या उत्तरावर त्यांनी आमदार अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला मारला. म्हणाले, अध्यक्ष आलेत तरी पक्षाध्यक्ष येतील असे वाटत नाही. असे उद्धव ठाकरे मिस्किलपणे म्हणाले.
कोणताही पक्ष फोडणं ही शिवसेनेच्या नियतीत नाही. कोण कुठून निवडणूक जिंकणार हरणार ही नंतरची बाब आहे. शिवसेना पक्ष मला वाढवायचा आहे. असे असले तरी कोणाचंही मन दुखावण्याचं काम मी करत नाही. सचिन अहिर हे त्यांच्या स्व मर्जीने खूशीने शिवसेनेत आले आहेत. त्यांचं स्वागत आहे. पक्ष फोडणं ही शिवसेनेची भूमिका नाही. मला फोडलेली माणसं नको आहेत. मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत. असे म्हणतानाच शिवसेना प्रमुख उद्धवराव ठाकरे म्हणाले, मी ‘घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवलेत मी फक्त चावी मारण्याचे काम करतो. त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष सेनेत आले असले तरी त्यांचे अध्यक्ष येतील असे वाटत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मिस्किलपणे हसत शरद पवारांना चिमटा काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे मनगटावरचे घड्याळ सोडून हातात शिवबंदन बांधले. आता ते अधिकृतपणे शिवसेनेत दाखल झाले आहे. यावेळी अहिर आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तसेच, शिवसेनेची ताकद आता वाढत आहे. शिवसेनेची नव्हे, तर मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद मजबूत होत आहे. त्यामुळे मराठी माणूस आणि हिंदूंकडे कोणीही वेड्या वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत.”
– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/niYiVZJlEW— ShivSena – शिवसेना (@ShivSena) July 25, 2019
nbsp;
The post घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवलेत; मी फक्त चावी मारण्याचे काम करतो – उद्धव ठाकरे appeared first on Maharashtra Today.