मुंबई- काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले असून, राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नसल्याचं विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. महापुरुषांचं योगदान पुतळ्यांमध्ये मोजू नका, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला आहे. सोबत येण्यासाठी काँग्रेसकडून वारंवार संपर्क साधला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.