अल-रिजवान ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी एम.बी.बी.एस. साठी पात्र

अल-रिजवान ज्युनिअर कॉलेजला परिचयाची आवश्यकता नाही. नांदेडच नव्हे तर संपुर्ण मराठावाड्यास आपल्या विविध शालेय उपक्रमामुळे प्रभावित करणार्‍या अल-रिजवान ज्यु. कॉलेजने नीट-2019 मध्ये आणखी एक पराक्रम करुन दाखविला आहे तो म्हणजे कॉलेजच्या नीट-2019 निकालातुन एक विद्यार्थीनी सादिया बुतुल खमरुद्दीन काजी हीने जालन्याच्या आय.आय.एम.एस.आर. मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावला आहे.

ही उपलब्धी कॉलेजच्या अशाच एक उपक्रमामुळे मिळाली तो म्हणजे ट्युशन फ्री फुल डे कॉलेज, एका विषयासाठी चार-चार अनुभवी, कुशल, मेहनती प्राध्यापक, जे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या पाठ्य क्रमा व्यतरिकत नीट-2019 ची परिपुर्ण तयारी ज्यादा तासिकांच्या सहाय्याने कॉलेजमध्येच करुन घेतात शिवाय नीट-2019 मध्ये निगेट्यु मार्कस कसे कमी व्हावे या बाबत योग्य ते मार्गदर्शन देऊन जास्तीत जास्त मार्क कसे मिळविता यावे यावर भर देउन परिपुर्ण तयारी करुन घेतात त्यामुळे शक्य झाली.

यामुळेच सादिया बुतुल खमरोद्दीन काजी हिने इयत्ता 12वीच्या निकालात 89टक्के गुण घेउन सोबतच नीट-2019 मध्ये 94.9577 परसेंटाईल मार्कस घेउन आपला एम.बी.बी.एस. चा प्रवेश निश्चीत केला आहे.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे डायरेक्टर श्री अब्दुल रशिद सर, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल वहिद साहब, कॉलेजच्या प्राचार्या सय्यदा तहेसीन फातेमा, उपप्राचार्या अर्शिया खुर्शिद फातेमा व अल-रिजवान ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांच्या टीम ने तीचे अभिनंद केले आहे व भविष्यासाठी तीला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading