अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तिची एन्ट्री


माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तिची एन्ट्री झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत ही व्यक्ति अनेकदा सुश्मितासोबत दिसली. या व्यक्तिचे नाव आहे,रोहमन शॉल. आता हे नाव ऐकून आम्ही सुश्मिताच्या लव्ह लाईफबद्दल बोलतोय, हे तर तुम्हाला कळले असेलच. होय, गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता रोहमनला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहमन एक मॉडल आहे. काल-परवा रोहमन आणि सुश्मिता एकत्र एअरपोर्टवर दिसले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत होता. त्यापूर्वी मुंबई फॅशन वीकमध्येही रोहमन दिसला़ सुश्मिता रॅम्प वॉक करत असताना रोहमन तिला चीअर करत होता. रोहमनसोबत सुश्मिताच्या दोन्ही मुलीही यावेळी हजर होत्या.सुश्मिताच्या आयुष्यात एन्ट्री घेणारा रोहमन पहिला नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे. इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. पण अलीकडे दोघांचे ब्रेकअप झाले.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading