२ जुलै च्या दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द , नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथून सुटणार

नांदेड :२.७.२०१९;मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे बऱ्याच गाड्यांवर परिणाम झाला होता. यामुळेच आज दिनांक २ जुलै २०१९ रोजी सुटणाऱ्या गाडी संख्या १७६१७-१७६१८ मुंबई-नांदेड-नमुंबई तपोवन एक्क्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच १ जुलै ला सुटलेली गाडी संख्या ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक पर्यंतच धावेल आणि दिनांक २ जुलै ला सुटणारी गाडी संख्या ११४०१ मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथूनच सुटेल. प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading