पुणे | राम कदमला झोडपायला मी कोल्हापूरहून 100 चपलेचे जोड आणले आहेत, ते सर्व युवतींच्या हातात देणार आहे, आणि कदमाला झोडपायला लावणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांनी केलं.राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.मेधा कुलकर्णींनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर कुलकर्णींना घरी भाकऱ्या थापत बसायला लागलं असतं.दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पाठवलेल्या धमकीच्या पत्राचाही त्यांनी ऩिषेध केला.