युवक काँग्रेसच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी तिरुपती कोंढेकर तर नांदेड दक्षिण अध्यक्षपदी अब्दुल गफ्फार

नवा मोंढा येथील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयात मतमोजणी पार पडली. निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पाच वर्षानंतर युवक काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तिरुपती उर्फ पप्पू कोंढेकर यांनी अर्ज भरला होता. तर शहराध्यक्ष पदासाठी विठ्ठल पावडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष तिरुपती कोंढेकर यांना १ हजार ३९१ मते पडली तर शहराध्यक्ष विठ्ठल पावडे यांना ४५० मते पडली.यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दत्तराव देशमुख, माधव कदम, विजय सोंडारे तर जिल्हा सरचिटणीस म्हणून बाजीराव डोंगरे, दिगंबर पाटील, गजानन कदम, नारायण कदम, शिवशंकर पाटील, सुहास मनाठकर, उमाकांत सरोदे आदी निवडून आले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकाही पार पडल्या. यामध्ये भोकर विधानसभाध्यक्षपदी मदन देशमुख कल्याणकर, नांदेड उत्तर विधानसभाध्यक्षपदी सत्यजित भोसले, नांदेड दक्षिण अध्यक्षपदी अब्दुल गफ्फार, नायगाव अध्यक्षपदी बालाजी शिंदे, देगलूर-बिलोली अध्यक्षपदी जनार्धन बिरादार, हदगाव अध्यक्षपदी संदीप शिंदे, किनवट अध्यक्षपदी आशिष कर्हाळे, लोहा अध्यक्षपदी युवराज वाघमारे, मुखेड अध्यक्षपदी किरण बोडके आदी उमेदवार निवडून आले आहेत. तसेच मतदारसंघनिहाय तेरा सरचिटणीस निवडून आले आहेत.  
Leave a comment