नांदेड जिल्हा माध्यमिक सतर शाळा  तीन महिन्यापासून बिनपगारी

0 23
जुलै-आॕगस्ट-सप्टेंबर चे वेतन प्रलंबीत
—————-
"इद”-"स्वातंत्र्य दिन”-"शिक्षक दिन” व्याजाच्या उसनवारीने केली
साजरी..
—————-
*”टाईड्स”* शिक्षक संघटना ने घेतली मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट
—————–
पगारीचा प्रश्न लवकर निकाली नाही निघाल्यास काळ्या फिती लावून निषेध करणार व नंतर आमरण उपोषणास बसणार.. डाॕ.एम.डब्ल्यू.शेख
—————–
नांदेड:सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परीषद नांदेड च्या 70 माध्यमिक शाळांच्या शेकडो माध्यमिक शिक्षक यांचे माहेवारी पगार जुलै २०१८ पासून अद्यापही झालेले नाहीत.  त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.  बकरी ईद , स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन सारखे भावनिक व जिव्हाळ्याचे सन देखील बिनपगारी, उसनवारी करावी लागली.  पाल्यांची शिक्षण फिस, गृह कर्जाचे हफ्ते , पतपेढीचे हफ्ते, इत्यादी. कसे भरावे हा यक्ष प्रश्न माध्यमिक शिक्षक यांच्या समोर उभा आहे.
सदरील पगारी बाबत संबंधित लिपीक यांच्या कडे विचारणा केली आसता, धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 19 कोटी ची आर्थिक तरतूद मूळ माध्यमिक शिक्षकांच्या करीता झालेली होती, परंतु त्याचे अयोग्य व बेजबाबदार नियमबाह्यपणे वाटप इतर शिर्षाखाली खर्च करण्यात आलेत त्यामुळे सदरील 70 माध्यमिक शाळेच्या शिक्षक यांचे पगारी तीन महिन्यापासून रखडल्या आहेत. सदरील संदर्भात *”टाईड्स”* शिक्षक संघटनेच्या वतीने डाॕ.एम.डब्ल्यू,एच. यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना भेटून या बाबतीत निवेदन आले, यावेळेस मा.शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह काकडे साहेबांनी चर्चा केली तथा राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हामणे यांच्याशी दुरध्वनी वर पगारी बाबतीत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी टाईड्स ची तळमळ कळविली व आश्वासन दिले की येत्या आठवड्यात सर्वांचे पगारी होतील.  त्यानुषंगाने  डाॕ.शेख यांनी सांगितले की जर पगारी वेळेवर नाही झाल्या तर जिल्ह्यातील तमाम माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून निषेध करतील त्याउपर ही पगारीचा प्रश्न निकालात नाही निघाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.
यावेळेस शिष्टमंडळात सय्यद अजहर, इरफान शेख, खलीक, एम.ए.खदीर , बि.ए.शिंदे, चव्हाण जी.सी., मोईद, मकबूल, मोईज, पळनाटे, हम्बर्डे , तसलीम शेख , डाॕ.एम.डब्ल्यू.एच.शेख सह अनेक शिक्षक उपस्थित होते