पत्रकारांवर हल्ला करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करा
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने मागणी
नांदेड/प्रतिनिधी-डांबर घोटाळ्यातील आरोपींच्या नातेवाईकांकडून भर कोर्टात पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण द्यावे अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
सोमवारी डांबर घोटाळ्यातील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायलयात वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार हजर होते. त्यावेळी आरोपींच्या नातेवाईकांनी पत्रकार प्रवीण खंदारे, प्रवीण देशमुख, कुंवरचंद मंडले यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकारांना संरक्षण द्यावे व भविष्यात आशा घटना घडनार नाहीत. यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, रविंद्र संगनवार, प्रल्हाद उमाटे, शिवराज बच्चेवार, विनायक एकबोटे, पंढरीनाथ बोकारे, सतीश मोहिते, योगेश लाठकर, प्रविण कंधारे, सूर्यकुमार यन्नावार, आजम बेग, गजानन कानडे, अविनाश चमकुरे, सुरेश काशिदे, अंकुश सोनसळे, हैदर अली, कुंवरचंद मंडले, प्रविण देशमुख, संघरत्न पवार, प्रमोद गजभारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.