नांदेड:गांजाशेतीचा पर्दाफाश, ७० किलो गांजासह एकास अटक

0 36

नांदेड – उमरी तालुक्यातील अस्वलदरी गावाच्या शिवारातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाच्या रोपांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून गांजाची झाडे व सुका गांजा जप्त केली आहेत. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. भीमराव राठोड असे त्या गांजा उत्पादकाचे नाव आहे

मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन,पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर व इतर कर्मच्यांनी अस्वलदरी शिवारात अचानक छापा टाकला. त्यावेळी भीमराव राठोड (व्यवसाय शेती) याने आपल्या शेतामध्ये गांजा लागवड लागवड केल्याचे आढळून आले.

कारवाईवेळी पोलिसांना राठोडच्या शेतात गांजाची झाडे(७० किलो) आढळून आली व शेतातील झोपडीमध्ये सुका गांजा आढळून आला. गांजा जप्त करत पोलिसांनी सुमारे ७४ किलो गांजा जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे करीत आहेत.