नांदेड : काँग्रेसला धक्का ناندیڑ: کانگریس کو دھکا

0 22

नांदेड – पलिकेचे स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. तिसरे अपत्य असल्यामुळे त्यांच्याबाबत नांदेडच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने त्यांचे पद अनधिकृत ठरवल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे. तसा आदेशच आयुक्तांनी काढले आहेत. काँग्रेसच्या आसिया बेगम यांचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द झाले असून, काँग्रेसला हा दूसरा मोठा धक्का आहे.त्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने या पुनरयाचिकेसंदर्भात ३० जुलै २०१८ ला आदेश देऊन हे प्रकरण निकाली काढले आहे. दिवाणी न्यायालयाने सप्टेंबर 2016 मध्ये दिलेल्या आदेश व निर्णयाद्वारे पवळे यांना अपात्र असल्याचे कळविले आहे.  महापालिकेतील कायदा, नियम व तरतुदीनुसार उमेश पवळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले.