गौरी लंकेश हत्या प्रकरणात वापरलेली ‘ती’ दुचाकी नांदेडमधील

0 56

नांदेड – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात नांदेडचा संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी नांदेडची असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने कर्नाटकचे विशेष पथक आणि अधिकारी नांदेड शहरात दाखल झाले आहेत. हत्या प्रकरणातील आरोपीचा थेट संबंध नांदेड शहराशी जोडला जात आहे.गेल्यावर्षी ५ सप्टेंबर रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या गोळ्या झाडून करण्यात आली होती. गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी नांदेड पासिंगची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दुचाकीचा मूळ मालक नांदेड येथील असून आतापर्यंत ही दुचाकी अनेक जणांसोबत खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी हे विशेष पथक नांदेड शहरात दाखल झाले आहे. पथकासोबत मुंबईच्या सीआयडीचे दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात चारही आरोपींचा कुठे ना कुठे संबंध जुळत आहे. याामुळे या हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमोल काळे व त्याच्या काही साथीदारांची विशेष पथकाकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे.