Diwali शब्दात ‘Ali’ शब्द येतो म्हणून योगी सरकार दिवाळीचं नाव बदलणार!

0 14

मुंबई | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं आहे. त्यामुळे योगींच्या या नाव बदलायच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे अामदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून दिवाळीचे नाव बददल्याचे म्हटले आहे. ‘Diwali या शब्दामध्ये ‘Ali’ शब्द असल्याने दिवाळी सणाचे नाव बदलून ‘दीनदयाल दीया-बाती धूम-धड़ाका पर्व’ असे नाव ठेवण्यात आल्याचा टोमणा लगावला आहे.दरम्यान, अलहाबादचं नाव बदलल्यामुळे योगी सरकारवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

News by thodkeeyat. Com