मेगा इंडीया एग्रो या कंपनीतील सरकारी मालकीचे असलेले १० धान्याचे ट्रक पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर पोलीस तपासात अनेक अधिकारी आणि बडे व्यापारी गुंतल्याचे उघड झाले होते. मात्र, हा धान्य घोटाळा दडपण्यासाठी यातील दोषी पुरवठा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आरोप व्याहाळकर यांनी केला आहे. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा दावा करणारे भाजप सरकार हा घोटाळा दडपून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. या घोटाळ्याचा जर पारदर्शक तपास केला तर मंत्रालयातील अनेक अधिकारी तुरुंगात जातील, असा दावाही व्याहाळकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये धान्य घोटाळ्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा धान्य घोटाळा चर्चेत आला आहे.

اپنی رائے یہاں لکھیں