‘शिवसेनेची नोंद गिनीज बूकमध्ये व्हावी’डी.पी.सावंत
नांदेड – राज्यात आणि केंद्रात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असूनही पहिल्या दिवसापासून सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची गिनीज बूकमध्ये नोंद व्हायला पाहिजे, असा टोला काँग्रेस आमदार डी.पी.सावंत यांनी लगावला.
सरकारमध्ये सहभागी असूनही सरकारलाच धमक्या देणारी शिवसेना आज दरवाढीसंदर्भात मौन बाळगत आहे. भारत बंदला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असतानाही शिवसेनेची आजची भूमिका निश्चितच संशयास्पद आहे, असेही सावंत म्हणाले. देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, जनता दल आदीसह अन्य पक्षांनी बंदला पाठिंबा दर्शविला होता.शिवसेनेने सरकारविरोधात नेहमी कातडीबचाऊ भूमिका घेतली आहे. भाजपबरोबर सत्तेत सहभागी असूनही शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरत आली आहे. वेळोवेळी भाजपविरोधात भूमिका घेण्याऐवजी शिवसेना संशयास्पद वागत आलेली आहे. आता भारत बंदच्या वेळीही शिवसेना कातडीबचाऊ भूमिकेत दिसून येत आहे.
By;marathi.eenaduindia.com