वसमत: 3 लाख 25 हजाराचा गुटखा जप्त

0 73

वसमत (फ़ेरोज पठाण) वसमत येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करणाऱ्या चार होलसेल ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली च्या पथकाने छापे मारून 3 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करत सदर व्यापा-यावर कार्यवाही केली आहे

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वसमत शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जगदीश भंडारदारा फौजदार सुभान केंद्रे,लंबे पोह/ नानाराव पोले ,बालाजी बोके ,गणेश राठोड ,शंकर जाधव ,मपोह/ रेशमा शेख , पो.ना.गजानन राठोड, ज्ञानेश्वर पंचलिंगे,अमित मोडक, हेमंत दराडे,भगवान आडे,ज्ञानेश्वर सावळे आदिच्या पथकाने आज रोजी दुपारी वसमत शहरातील 4 प्रमुख गुटखा विक्रीच्या ठिकाणावर छापे मारले यात

1) निवृत्ती मारोती जाधव विरेगाव 128590 ₹

2) राजेश दत्तराव शेवाळे वसमत 69475 ₹

3) बालाप्रसाद तुकाराम पैंजणे वसमत 59118 ₹

4) शेख शकिल शेख अहेमद वसमत 68330 ₹

असे एकूण 3,25,515 ₹

रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सबधिता विरुद्ध कार्यवाही केली आहे

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे