भीमशक्तीचे प्रशांत इंगोले यांचा इशारा
नांदेड – माहे सप्टेंबर 2018 प्रमाणे सणासुदीच्या दिवसात रास्त भाव दुकानदारामार्फत साखर, गहू , तांदूळ इत्यादी धान्य लाभधारकांना 100% वितरीत करा अन्यथा या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जिल्हाधिकार्यांमार्फत पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानातून लाभधारकांना पूर्णपणे धान्य वितरित होत नाही. याबाबत भीमशक्ती ने दिलेल्या निवेदनात नांदेड जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर 2018 प्रमाणे सिधा पत्रिका धारकांची नावे अंतोदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना पात्र यादीमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये समाविष्ठ असून त्यांना माहे सप्टेंबर 2018 पर्यंत नियमाप्रमाणे अन्नधान्य पुरवठा करण्यात येत होता, परंतु ऑक्टोबर 2018 मध्ये ज्यांची नावे ऑनलाईन आहेत व त्यांना माहे सप्टेंबर 2018 मध्ये उचल केलेली आहे अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे ऑफलाईन सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी काही कारणास्तव धान्य उचलले नाही त्यांना माहे ऑक्टोबर 2018 मध्ये धान्य देण्यात येत नाही मात्र शिधापत्रिकाधारकांना ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 पर्यंत सप्टेंबर 2018 प्रमाणे धान्य उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सणासुदीच्या काळामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही निवेदनात म्हटले आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंद गवई या शिधापत्रिका धारकाला वेळेवर राशन न मिळाल्यामुळे त्याचा भूकबळीने मृत्यू झाला. राशन धान्य वेळेवर दिले गेले नाही तर अशा घटना राज्यात घडू शकतात असे पत्रकात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. संघटनेने या निवेदनात गवई यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा तहसीलदार, पुरवठा नायब तहसीलदार, पुरवठा पेशकार, कारकून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे की शासनाने कुठेही आदेश नसताना नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी , जिल्ह्यातील तहसीलदार, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार, पेशकार, लिपिक यांनी नांदेड जिल्ह्यातील काही तालुके वगळता अन्नधान्य कपात केला आहे त्याची वरिष्ठ आयएएस अधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात यावे व पात्र लाभार्थी वंचित राहत असून त्याची जबाबदारी वरील अधिकार्यावर निश्चित करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . सप्टेबर 2018 च्या संदर्भानेे वाटपाबाबत काही राशन दुकानदारांना संघटनेच्या वतीने विचारणा केली असता, त्याने धान्य ईपास मशीन मधून वाटप झाले असून तेवढेच धान्य आम्हाला मिळाले असून आम्ही सप्टेंबर 2018 मध्ये पुरवठा विभागाकडून आमच्याकडे आले होते. त्यांनाच आम्ही धान्य देत आहोत असे सांगितले. त्याप्रमाणे मॅनिवली सुद्धा वाटप करू नका असे व्हाट्सअप च्या माध्यमातून कळविले असून आम्ही फक्त ज्यांची ऑनलाईन मध्ये नावे आहेत त्यांना धान्य वाटप करत आहोत. मोठ्या प्रमाणात धान्य कमी दिल्यामुळे आमचा नाईलाज आहे असे सांगत आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालय अथवा मंत्रालय यांचे आदेश नसताना बेकायदेशीरपणे धान्यापासून शिधापत्रिकाधारकांना वंचित ठेवणार्या संबंधित अधिकार्याविरुद्ध कारवाई करावी व त्याला निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे . उपरोक्त मागन्या तात्काळ पूर्ण न झाल्यास व जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वेळेवर संपूर्ण धान्य उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे