शिक्षातज्ञ मोहंमद अशफाक अहेमद यांचे निधन

औरंगाबाद : २० आँक्टोबर ( प्रतिनिधी) अलहिरा एज्युकेशन एण्ड वेलफेअर सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष मोहंमद अशफाक अहेमद यांचे आज दु:खद निधन झाले आहे. प्रसिद्ध इकरा उर्दू शाळेची नीव औरंगाबाद येथे टाकून अल्पसंख्याक समाजात शिक्षणामध्ये त्यांचे अनमोल योगदान होते. अलहिराच्या माध्यमातून व जमाअत ए इस्लामीचे मर्कजी माजी सचिव असताना शिक्षण व धार्मिक प्रचार प्रसार तजे जीवनभर करत राहीले. तंजीम स्टुडंट इस्लामिक आँर्गानायझेशन आँफ इंडिया चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्याच्या गेल्याने जमाअत ए इस्लामी हिंदचा आधारवड गेला आहे.

त्यांची नमाजे जनाजा आज शनिवारी बाद नमाजे इशा, रात्री-८.१५ वाजता जामा मस्जिद बुढीलेन औरंगाबाद येथे होईल. तदफीन व दफनविधी काली मस्जिद ,शाहबाजार येथे होईल अशी माहिती जमाअते इस्लामी हिंदचे मीडिया सेलचे आदील मदनी यांनी दिली आहे.

Leave a comment