विनाअनुदानित सिलेंडर 59 रुपयांनी वाढला…पाहा आणखी काय वाढले…

0 0

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये 1.95 रुपयांनी दर वाढविला आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार .

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. रुपयाचे अवमुल्यन आणि आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढत चाललेले भाव इंधनाच्या दरांवर परिणाम करत असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90.84 आणि डिझेल 79.40 वर पोहोचले आहेत. तर सीएनजी 44.22 च्या आसपास आहे.

केंद्र सरकराने आज वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना तिहेरी शॉक दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 59 रुपयांची वाढ केली. तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ करण्य़ात आली आहे.

तसेच विमानाच्या इंधनाचीही 2650 रुपये प्रतिकिलो लिटरला विक्री केली जाणार आहे. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. एक किलो लिटरमध्ये 1000 लीटर इंधन मिळते.

News by lokmat. com