लोहा नगर पालिका निवडणुक; अध्यक्षपदासाठी ११ तर नगरसेवक पदासाठी १३४ अर्ज दाखल
नगराध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग आठमध्ये नगरसेवक पदासाठी १२८ नामनिर्देशपत्र आले आहेत. आतापर्यंत एकूण १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी दिली. लोहा पालिका निवडणुकीसाठी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी एकूण ११ जणांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहेत. मंगळवारी नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
दाखल करण्यात आलेले अर्ज:प्रभाग १ अ – सर्वसाधारण महिला (५ अर्ज), प्रभाग १ ब – नागरिकाचा मागास प्रवर्ग (७ अर्ज), प्रभाग २ अ – सर्वसाधारण महिला (५ अर्ज), प्रभाग क्र. २ ब – अनुसूचित जाती (८ अर्ज), प्रभाग ३ अ – अनुसूचित जाती महिला (९ अर्ज), प्रभाग ३ ब – सर्वसाधारण (९ अर्ज), भाग ४ अ – अनुसूचित जाती महिला (१० अर्ज), प्रभाग ४ ब – सर्वसाधारण (१० अर्ज), प्रभाग ५ अ – नागरिकाचा मागास महिला (४ अर्ज), प्रभाग ५ ब – सर्वसाधारण (८ अर्ज), प्रभाग ६ अ – नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (६ अर्ज), प्रभाग ६ ब – सर्वसाधारण महिला (९ अर्ज), प्रभाग ६ क – सर्वसाधारण (७ अर्ज), प्रभाग ७ अ – नागरिकाचा मागासप्रवर्ग (महिला ६ अर्ज), प्रभाग ७ ब – ( ११ अर्ज), प्रभाग ८ अ – सर्वसाधारण महिला (४ अर्ज), प्रभाग ८ ब – नागरिकाचा मागासप्रवर्ग (१० अर्ज) अशी एकूण १३४ अर्ज दाखल झाले आहेत.