राहुल यांच्या नांदेड `एंट्री`मागे चव्हाण विरोधकांचा मास्टरस्ट्रोक!

नांदेड : 22.जनवरी-पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे राहुल गांधी हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असल्याच्या बातमीने संपुर्ण देशातील काँग्रेसजण आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष नांदेडकडे वेधले गेले आहे. त्याचबरोबर राहुल गांधीना नांदेडची उमेदवारी म्हणजे काँग्रेसमधील अशोक चव्हाण विरोधकांचा ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

یہ بھی پڑھیں

راہول گاندھی کے ناندیڑ سے الیکشن لڑنے کی خبروں پر اشوک چوہان نے کیا کہا دیکھئے

मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीत गांधीना भाजपच्या स्मृती ईराणी यांनी चांगलीच टक्कर दिली होती. त्यांमुळे राहुल गांधी लोकसभेसाठी ‘सेफ पँसेज’ असलेली जागा शोधत आहेत. त्यात त्यांना नांदेड लोकसभा’ सिट’ निवडुन येण्यासाठी ‘सुरक्षित’ वाटत असल्याने ते नांदेडमधून निवडणूक लढवतील, असा दावा या चर्चेमागे केला जात आहे.

हे सर्व सत्य असले तरी राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय सुंदोपसंदी लपून राहिलेला नाही. तसेच चव्हाणांचा अंतर्गत विरोधी गट कधी नव्हे तो आक्रमक होताना दिसत असल्याने चव्हाण समर्थकांत अस्वस्थता पसरल्याचे समजते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात राहुल गांधींचे जवळचे समजले जाणारे हिंगोलीतून राजीव सातव हे आणि नांदेडमधून माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोनच जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे नांदेड काॅंग्रेससाठी आजही सर्वात सुरक्षित जागा आहे, यात वादच नाही. मात्र या राजकारणाला स्थानिक पदर आहेत.

मुख्यमंत्रिपदाचे भावी दावेदार म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव त्यांचे समर्थक पुढे दामटत आहेत. काही दिवसांपूर्वीच नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी व भोकरच्या आमदार अमिता चव्हाण यांच्या नावाचा ठराव जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत आमदार अमर राजूरकर यांनी मांडला होता. त्यामुळे चव्हाण समर्थकांना अशोक चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणात पाहिजेत, हे चित्र निर्माण झाले. या खेळीला आता तितकेच प्रत्युत्तर त्यांच्या विरोधी गटाने दिल्याचे बोलले जात आहे.

राहुलना समोर करुन चव्हाणांच्या सत्ताशाहीला सुरुंग लावण्याची तर अंतर्गत विरोधकांचा डाव नाही, का असा प्रश्न एका जेष्ट कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे. राहुल नांदेडला आले किंवा नाही आले तरी सध्या यावर देशभराच चर्चा सुरू झाली आङे.

राहुल गांधींनी नांदेडची निवडणूक लढविली तर हिंगोली चे खासदार राजीव सातव यांच राजकीय महत्व वाढणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. सातव हे राहुल गांधीच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे अशोक चव्हाण किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांपेक्षा राज्यातील निवडणुकीत सातव यांच्या शब्दाला वजन येण्याचा धोका चव्हाण समर्थकांना वाटत आहे. स्वतः सातव हे चव्हाण यांच्या सहकार्य़ामुळे लोकसभेत पोहोचू शकले. मात्र राहुल यांना नांदेडच्या जागेवर उभे करण्याची कल्पना सातव यांची तर नाही ना, अशी शंका चव्हाण समर्थक घेत आहेत.

Leave a comment