पुसद (फेरोज़ पठाण)राज्य राखीव पोलिस दल हिंगोलीचे जवान आपल्या वाहनाने गडचिरोली येथे बंदोबस्त कामी जात असताना शनिवारी दि 20 ओक्टोबर रोजी सकाळी पुसद येथे वाहन पल्टी होउंन झालेल्या अपघातात 2 जण गंभीर तर 18 जवान जख्मी झाले आहेत.अधिक माहिती अशी की राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक 12 चे जवान आपले वाहन क्र MH38/G-0308 ने गडचिरोली येथे बंदोबस्त कामी जात असताना उमरखेड़-पुसद रोडवरील पुसद ग्रामीण पोलिसांच्या हद्दी मधील सांडवा-मांडवा या गावाच्या जवळ रोडवर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोरील ट्रॅक्टरला लागणारी धडक वाचवण्यासाठी ड्रायव्हर अरविंद पवार यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला घेताना रोडवर उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडक दिल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने त्यामध्ये असलेल्या 35 जवानांपैकी 20 जवान जखमी झाल्याची घटना शनिवार दि 20 ओक्टोबर रोजी सकाळी घडली.लागलीच घटना स्थळी धाव घेत गावक-यांनी मदतीचा हात देत व जख्मी जवाणाना बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव भुजबळ,ठाणेदार धनंजय सायरे,संजय चौबे तसेच पोलिस स्टेशन पुसद शहर,ग्रामीण व वसंत नगरचे सर्व कर्मचारी वृंद घटनास्थळी दाखल झाले होते पोलिस व 108 च्या वाहनाने जख़्मीना पुसद उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यापैकी दोन जवान गंभीर असल्याने त्यांना पुसद येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.जख्मी जवानात सचिन पवार,बाबुराव पवार,जुबेर काजीमिया,ज्ञानदेव तोते प्रदीप माने,प्रकाश सूर्यतळ, मनोज माने,भगवान चव्हाण,नागेश कांबळे, अतुल रदवे,अरविंद पवार,महेमुद शेख,नागेश मोरे,कैलास चौधरी,राजेश फुलावरे,नंदू भानुसे संदीप गायकवाड, पांडुरंग गुहाळे या जवानांचा समावेश आहे.दरम्यान हिंगोली जिल्ह्य पोलीस अधिक्षक योगेश कुमार हे बचाव कार्यसाठी पुसद पोलिसांशी संपर्कात होते