माहूर मध्ये दोन गटात हाणामारी;तीन जखमी! तणावपूर्ण शांतता ! एम आइ एम नगरसेविकाचा मुलगा ज़ख़्मी

माहूर:-(Akram Chohan) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारचा दरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून एक जण गंभीर असून त्याला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटल मध्ये अधिक उपचरा साठी पाठविण्यात आले आहे.

 

◾ आज दिनांक 19 शुक्रवार रोजी माहूर शहरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास वार्ड क्रमांक 13 मधील मारुती मंदिराजवळ मारण्याची घटना घडली होती. त्यानंतर दुपारी एक ते दोन च्या दरम्यान शिवसेने चे तालुका प्रमुख सुदर्शन जोगाराम राठोड (नाईक), सोनू उर्फ आशिष चारभाई, पवन शर्मा, शक्ती ठाकूर अविनाश मोहन राठोड अक्षय परस्कर संदीप हुसे, व इतर 20 ते 25 लोकांच्या जमावाने कुठलेच कारण नसताना कट रचून पत्रकार तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नगराध्यक्षाचे बंधू सरफराज दोसानी यांचे मालकीचे न्यू माहेर कलेक्शन यांच्या कापड दुकानात हातात घण (दगड फोडण्याचा हातोडा) लाट्या, काठ्या, लोखंडी रॉड, घेऊन दुकानात घुसून दुकातील माल लुटण्याचा प्रयत्न केला.व दहशत निर्माण केली.सोबतच आज शुक्रवार रोजीचा दिवस भराचा धंद्याची रोख रक्कम व दिनांक १७ व १८ रोजी बँक बंद असल्याने दोन दिवसाचा धंद्यातील रक्कम असे एकूण दोन ते अडीच लक्ष रुपये गल्यातून कॉंटर मधून काढून घेतले.मागील सहा महिन्ांपूर्वीच दोसाणी यांची फ्रायबर फर्निचर ची दुकान जाळून ७० ते ७५ लक्ष रुपयाचा नुकसान करण्यात आले होते,याच लोकांनी आमची दुकान जाळली असावी असा संशय पोलिसात दिलेल्या तक्रारीत फिर्यादी सरफराज दोसानी यांनी व्यक्त केला असून मोठे बंधू फिरोज दोसानी हे नगराध्यक्ष असल्याने आमच्या परिवारावर सातत्याने असे हल्ले होते असून आमच्या परिवाराचा आर्थिक व शारीरिक नुकसानीचा हेतू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान जखमी वर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे, डॉ.निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून यवतमाळकडे रेफर केले.या हाणामारीत एमआयएम नगरसेविकाचा मुलगा शे.सज्जाद शे. अजीज हा गंभीर जखमी झाला.त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून सावंगी मेघे येथे हलविण्यात आले. या घटनेने माहूर शहरात दिवसभर तणाव निर्माण झाला होता.

सेनेच्या जमावामने दहशत पसरवीत शहरातील व्यापाऱ्याना आपली प्रतिष्ठाने बंद करण्यास भाग पाडले.या घटनेची दखल घेत कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी काही पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्तात दुसरीकडे गेलेले असतांना सिंदखेड व विदर्भातील महागाव पोलिसांना पाचारण करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविल्याने शहरात तूर्तास शांतता अबाधित राहिली असून माहूर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.दरम्यान तालुक्यातील व शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार पवार, माहूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आसाराम जवाहर हे माहूर येथे ठाण मांडून बसले असून एसआरपी फोर्स बोलावण्यात आला असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाई बाजार येथे झालेल्या शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेत जी.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर जाहीर भाषणात अर्वाच भाषेत कौटुंबिक टिपण्णी केल्यानेच राग अनावर होऊन हा प्रकार घडल्याची शहरातील नागरिकात चर्चा होती.आर सी पी भोकर येथील 10, मांडवी, हदगावं, हिमायतनगर, इस्लापूर, येथून 50 पोलिस कर्मचारी बोलवण्यात आले आहे.

Leave a comment