माहूर नगराध्यक्ष निवड:एम आय एम ,काँग्रेस, राष्ट्रवादी, व च्या नगरसेवकांनी केला भाजपाच्या बाजू ने मतदान!

12

माहूर:- माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल मेघराज जाधव यांची ईश्वर चिठ्ठी ने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी…… यांची निवड करण्यात आली आहे.अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगर पंचायत सदस्या मधून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी साठी झालेल्या मतदानात काँग्रेस चे बंडखोर नगरसेवक इलियास बावानी ,राष्ट्रवादी चे रहमत आली,व एम आय एम च्या शारिफा बी आजीज या तिन्ही मुस्लिम नगरसेवकांनी भाजपाच्या दिपाली नाना लाड यांच्या बाजूने मतदान केल्याने त्यांना ८ तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या शीतल मेघराज जाधव यांना ही ८ मतदान मिळाल्याने पीठासिन अधिकारी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ईश्वर चिठ्ठी ने निवड करण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेच्या नगरसेविका प्रिया राजाराम गांधेवाड यांनी काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल मेघराज जाधव यांची निवड झाली

◾माहूर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पुढील अडीच वर्षाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित होते.भाजपाकडे केवळ एकच नगरसेवक तर शिवसेनेकडे चार नगरसेवक होते.हा युती चा आकडा ५ वरच पोहचत होता.त्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे शितल मेघराज जाधव नगराध्यक्षपदी विराजमान होतील हे स्पष्ट होते. परंतु निवडणुकीच्या आदल्या रात्री घोडेबाजार तेज होऊन आघाडी धर्म न पाळता हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या इलियास बावानी सवपक्षीय राष्ट्रवादीचे रहमत अली व मुस्लिम पुरस्कर्ते असलेल्या एमआयएमच्या शरीफा बी आजिज यांनी बंडखोरी केल्याने भाजपाच्या दिपाली ज्ञानेश्वर लाड यांना आठ मते मिळाली. राजकारणात कोणी कोणाचा मित्र तर कोणी कोणाचा शत्रू नसतो याप्रमाणे नगराध्यक्ष साठी ११ मते असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेस आघाडीच्या उमेदवार शितल जाधव यांना बंडखोरांचा फटका बसल्याने आठच मते मिळाली.शेवटी ईश्वर चिठ्ठी ने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल जाधव यांना नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला. उपनगराध्यक्ष साठी भाजपा सेना युती कडून राष्ट्रवादी चे बंडखोर रेहमत आली यांनी तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी कडून अश्विनी तुपदाळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यात दोघांना १६ पैकी आठ आठ मते मिळाली.उपाध्यक्षपदासाठी सुद्धा ईश्वर चिठ्ठीने मतदान होऊन आश्र्विनी तुपदाळे हे विजयी झाले. त्यांना पीठासीन अधिकारी अभिनव गोयल,यांनी विजयी घोषित केले. यावेळी तहसीलदार सिध्देश्वर नाही ,मुख्याधिकारी विद्या कदम,कार्यलायीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी विजयी घोषित केले.नवनियुक्त नगराध्यक्ष शितल जाधव यांच्या आई कै. सुनीता मेघराज जाधव ह्या या पूर्वी माहूर च्या सरपंच होत्या. ग्रा. प तून नगर पंचायत मध्ये रुपांतर झालेल्या नप नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हकण्याचा बहुमान या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ला २ वेळा काँग्रेस ला दोन वेळा मिळाला आहे.यात संघर्षाच्या वादग्रस्त वाटेवरुन का होईना आता पर्यंत च्या सर्व नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाहता सर्वाधिक कार्यकाळ मावळते नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा राहीला हे मात्र विशेष.

@@@@@ मागील अडीच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विकास रथ शहरात सुरू ठेवला होता.त्याच प्रमाणे या पुढे विकास रथ सुरू राहणार असून शहराचा विकास हाच एक मेव ध्यास असल्याची प्रतिक्रिया नूतन नगराध्यक्ष शितल जाधव,आश्र्विनी तुपदाळे यांनी दिली.या वेळी दिनकर दहिफळे,संजय राठोड, हाजी उस्मान खान,दत्तराव मोहिते, मेघराज जाधव,प्रकाश राठोड, बंडू पाटील,विनोद राठोड,अनिल कराळे,विशाल जाधव,अमजद खान,राहुल नाईक,आनंद तूपदाळे,मारोती रेकुलवार,भगवान जोगदंड, अरिविंद राठोड, यांच्या सह नगराध्यक्ष शितल जाधव,उपनगराध्यक्ष अश्विनी तुपदाळे,नगरसेवक राजेंद्र केशवें,राजकुमार भोपी,रफिक सौदागर,शाकिला बी शब्बीर,ज्योती कदम,वनिता जोगदंड,गोपू महामूने,
उपस्थिती होती.