आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्रातील निवडणुकांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान पार पडणार आहे.17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे

 

महाराष्ट्रातील पहिला टप्पा : – 11 एप्रिल 2019
1 वर्धा लोकसभा मतदारसंघ
2 रामटेक लोकसभा मतदारसंघ
3 नागपूर लोकसभा मतदारसंघ
4 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
5 गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ
6 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
7 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019
1 बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
2 अकोला लोकसभा मतदारसंघ
3 अमरावती लोकसभा मतदारसंघ
4 हिंगोली लोकसभा मतदारसंघ
5 नांदेड लोकसभा मतदारसंघ
6 परभणी लोकसभा मतदारसंघ
7 बीड लोकसभा मतदारसंघ
8 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ
9 लातूर लोकसभा मतदारसंघ
10 सोलापूर लोकसभा मतदारसंघ

तिसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदारसंघ
मतदानाची तारीख 23 एप्रिल
मतदारसंघ – जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.


اپنی رائے یہاں لکھیں