भाजप–शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; 16 खासदार,आमदार काँग्रेसच्या संपर्कात?

0 1

मुंबई | भाजप-शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारमधील काही खासदार आणि आमदार काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही खासदार आणि काही आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांनी दिली आहे. फर्स्टपोस्ट या इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.मराठवाड्यातील शिवसेनेचा एक बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक खासदार आणि काही आमदार काँग्रेसमध्ये येणार आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.