परभणी :प्रभाग क्र. १४ अ च्या पोटनिव्डणूकीत कॉग्रेसच्या सौ. खान शहेनाजबी अकबर खान विजयी

परभणी : प्रतिनिधी .शहर महानगर पालीकेच्या प्रभाग क्र. १४ अ साठी पोटनिव्डणूक घेण्यात आली. त्यात सकाळी १० वा. निर्वाचण अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे,सहा. निर्वाचन अधिकारी तहसिलदार विद्याचरण कडवकर, सहा.नि.अ.जायभाये,तसेच किरण फुटाणे, नगरसचिव विकास रत्नपारखे,अदनान कादरी,राजाभाऊ मोरे,मुताहेर खान, सहा.आयुक्त मुसद्दीक खान,शिवाजी सरनाईक ,अल्केश देशमुख आदींनी मतमोजणीसाठी उपस्थित होते.
सदरील मतमोजणी चारफेºया करण्यात आल्या. आज दि. ७ फेर्ब्रुवारी २०२० मध्ये खान शहनाज बी अकबर खान स (भारतीय राष्टÑीय कॉग्रेस) ४२७९,सय्यद महेबुब अली स. अहेमद अली (राष्टÑवादी कॉग्रेस पार्टी) २३५१ तर बेगम शबाना अलीमोद्दीन (अपक्ष) ४० , खटके सतीश भाऊराव (शिवसेना) ७०९ ,स. आबेद स. उस्मान (अपक्ष) ४८ मते मिळाली. एकूण वैध मते  ७४९५ ,नोटासाठी मतदान ६८, या मतमोजणी प्रकियेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यलय,महानगर पालीका,औद्योगीक प्रशिक्षण संस्था, स्वच्छता कर्मचारी आदीचे मोलाचे सहकार्य लाभले.
या निवडणूकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खान शहनाज बी अकबर खान यांचे अभिनंदन आ.सुरेशरावजी वरपूडकर, मा.आ. सुरेशरावजी देशमुख, मा.खा. तुकाराम रेंगे, महापौर सौ.अनिताताई सोनकांबळे,उप महापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, सुनिल देशमुख, रविंद्र सोनकांबळे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, ता.अध्यक्ष पंजाब देशमुख,अब्दुल हफीज चाऊस, सभापती गुलमीर खान,इरफानुर रहेमान आदींनी अभिनंदन के ले आहे.