नांदेड -:’लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या केदारनाथ चित्रपटावर बंदी घाला; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

0 13
निवेदनात म्हटले आहे, की यासंदर्भात जनभावनांचा उद्रेक होण्याआधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली पाहिजे. यातील वादग्रस्त प्रसंग वगळून सुधारीत चित्रपट हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येत नाही आणि त्या प्रतिनिधींची त्यास संमती मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थितीत हा चित्रपट प्रदर्शित करू नये. चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंची मंदिरे तीर्थस्थाने, धर्मग्रंथ व देवदेवता यांचा वापर चुकीच्या पध्दतीने केला जाऊ नये, यासाठी केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने नियमावली बनवावी. या मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे. लव्ह इज पिलीग्रिमेज ही टॅगलाईन त्वरित बदलावी, केदारनाथ चित्रपटाचे नाव बदलून टाकावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न केल्यास होणार्‍या जनउद्रेकास केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळ जबाबदार असेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे शशिकांत पाटील, प्रमोद जैन, मनपाच्या विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी, दिलीपसिंग सोडी, महेश देबडवार, बिरबल यादव, गणेश ठाकुर, सोनू उपाध्याय, विकास परदेशी, अमित मोदी, सुमंत देशमुख, किशन फटाले, आदर्श यादव, बबलू यादव, मायाजी शर्मा, अक्षय भोयर पाटील, भास्कर डोईबळे, चक्रधर कपाटे, कांचन दिवेकर, रेश्मी निकुंभ, शुभंम कुलकर्णी, वैभव आफळे, मनोहर देशपांडे, गजानन यादव, सूरज जोमेगावकर, सौरभ जाधव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.