नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर

0 12

नांदेड – जिल्ह्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसाच्या पुरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. तसेच मांजरम गावातील देखील एक जण वाहून गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. आमदार वसंतराव चव्हाण, आमदार राम रातोळीकर, तहसीलदार सौ. सुरेखा नांदे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली आहे. मागील चार दिवसांपूर्वी नायगाव तालुक्यात सतत २४ तास पाऊस पडल्याने सर्वच नदी नाले तुडूंब भरून वाहत होते. दिनांक २० रोजी बरबडा येथील गंगाधर दिवटे हे आपल्या पत्नी व मुलीसह मांजरम येथे पाहुण्याकडे आले होते. कार्यक्रम आटोपून रात्री साडे नऊ वाजता जीपने बरबडा येथे जात होते. मांजरम कोलंबी दरम्यान असलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असताना त्याचवेळी गंगाधर दिवटे यांनी सदर जीप पुराच्या पाण्यातून नेत होते. पुराच्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने सदर जीप या पुरात वाहून गेली. यात गंगाधर दिवटे त्यांची पत्नी पारूबाई व मुलगी अनुसया या तिघांचाही मुत्यृ झाला. मांजरम ब्रेद्री दरम्यान असलेल्या नाल्याच्या पुरात मांजरम येथील विनायक बालाजी गायकवाड हे वाहुन गेल्याने त्यांचाही यात मृत्यु झाला आहे. त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून बरबडा येथील मयत गंगाधर दिवटे यांचा वारस असलेला मुलगा बालाजी गंगाधर दिवटे यास गुरूवारी नायगाव तहसिल प्रशासनाच्यावतीने बारा लाखांचा धनादेश आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार वसंतराव चव्हाण, तहसीलदार सौ.सुरेखा नांदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सरपंच बालाजी मद्देवाड, जि.प.सदस्याचे प्रतिनिधी पंढरीनाथ कमठेवाड, प्रा. मनोहर पवार, सभापती शिवाजी पा. जाधव, उपसरपंच लक्ष्मण सिगेवाड, मंडळधिकारी कपाटे, तलाठी बालाजी राठोड यांची उपस्थिती होती.