नांदेड .:ऑनलाईन मटका बुकिंगवर पोलिसांनी छापा टाकला
नांदेड – शहराच्या शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन मटका बुकिंगवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ४ जुगाऱ्यांना अटक करून अड्ड्यावरुन रोख रकमेसह ३० हजारांचा मुद्दमेमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे फौजदार गोपीनाथ वाघमारे व हवालदार मारुती तेलंग, अरुण कदम राजकुमार डोंगर, अविनाश पांचाळ ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास पेट्रोलिंग (गस्त) करीत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी जय भीमनगर कमानीजवळ मेघराज खंदारे यांच्या घरात छापा टाकला. यावेळी या ठिकाणी १ व्यक्ती ऑनलाईन लॉटरी नावाचा मटका चालवित होता. त्या अड्ड्यावर मटका खेळणारे जुगारी थांबून होते. पोलिसांना पाहून काही जण घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र, पोलिसांनी ४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.