नांदेड:केंद्र शासनाच्या आरक्षण विरोधी भूमिकेविरुध्द काँग्रेसचे भव्य निदर्शने

बहुमतामुळे हुकूमशाही – राजूरकर; आरक्षण विरोधी प्रतिज्ञापत्र – सावंत
नांदेड – केेंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजप सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील करोडो जनतेला आरक्षणापासून दूर करुन त्यांचे संसार उघड्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र शासनाची ही भूमिका आरक्षण विरोधी आहे, असे सांगत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भव्य निदर्शने केली.
भाजपाचे केंद्रात असलेले सरकार असंविधानीक काम करीत आहे. शासकीय व निमशासकीय पदावर नोकरी करतांना राज्य घटनेप्रमाणे आरक्षणाचा अधिकार आहे. परंतु हा मौलिक अधिकार हिसकावून घेण्याचे काम हे सरकार करीत आहे. न्यायालयापुढे जे प्रतिज्ञापत्र शासनाने दाखल केले त्यामध्ये आरक्षणासंदर्भात संदिग्ध भूमिका घेतली. त्यामुळेच आरक्षण देणे हे राज्य सरकारवर अवंलंबून असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयातून देशातील आरक्षण हळुहळू कमी करण्याचा भाजपचा डाव आहे.

सर्वोच्च न्यायालयापुढे भाजपाने 2019 मध्ये स्पेशन सिव्हील 27715 या दाखल्यात आरक्षणाबाबत प्रामाणिक भूमिका मांडली नाही. भाजव व संघ परिवाराने नेहमीच आरक्षण बंद करणे किंवा याचा पुर्नविचार करणे यावर भर दिला आहे.

केंद्रातील भाजप सरकार आरक्षण विरोधी भूमिका घेत असल्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाची ही भूमिका मागासवर्गीयांवर अन्याय करणारी असून यातून समाजावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसच्यावतीने म्हटले आहे.
यावेळी बोलतांना आ.अमरनाथ राजूरकर यांनी केंद्र शासनावर टिका करतांना पाशवी बहुमताच्या बळावर देशामध्ये हुकूमशाही आणण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला. तर न्यायालयामध्ये उत्तराखंड सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करुन आरक्षणाला विरोध दर्शविला. याचाच अर्थ भाजपाचे खाण्याचे आणि दाखविण्याचे दात वेगळे आहेत हे सिध्द होते.
यावेळी बी.आर.कदम, गोविंदराव शिंदे नागेलीकर, अ‍ॅड.सुरेंद्र घोडजकर, शमीम अब्दुल्ला, गंगाधर सोंडारे, बापूराव गजभारे, डॉ.आरसीया कौसर, जयश्री पावडे, सुभाष रायबोले, रोहिदास जाधव, डॉ.करुणा जमदाडे यांनी आपल्या भाषणामधून भाजप सरकारच्या आरक्षणविरोधी भूमिकेला कडाडून विरोध केला. यानंतर जिल्हा प्रशासनास काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी.आर.कदम, ज्येष्ठ नेते शेषेराव चव्हाण, अरविंद नळगे, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती अ‍ॅड.रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपाचे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, विजय येवनकर, दिलीन पाटील बेटमोगरेकर,  श्याम दरक, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, प्रकाशकौर खालसा, आरसीया कौसर,मंगलाताई निमकर, अनिता हिंगोले, सौ.रेखा चव्हाण,  बापूराव गजभारे, करुणा जमदाडे, कविता कळसकर, अनुजा तेहरा, मंगलाताई धुळेकर, सौ.शैलजा स्वामी, अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, शमीम अब्दुल्ला, मसूद खान, पप्पू पाटील कोंडेकर, अलिम खान, अ‍ॅड.निलेश पावडे, विठ्ठल पावडे, दिपक पाटील, संदीप सोनकांबळे, संभाजी भिलवंडे, अर्पणा नेरलकर, माधव कदम, जगदीश पाटील भोसीकर, बालाजी गव्हाणे, उध्दवराव पवार, शंकर शिंदे, सत्यजित भोसले, रुपेश यादव, प्रवक्ते मुंतजिब, सुरेश हाटकर, अजहर कुरेशी निरंजन पावडे, लक्ष्मीकांत गोणे, संतोष कुलकर्णी, उमाकांत पवार, उत्तम लोमटे, विलास धबाले, संतोष मुळे, मंगेश कदम, अ‍ॅड.धम्मा कदम, श्याम कोकाटे, एन.के.सरोदे, किशन कल्याणकर, विठ्ठल पाटील डक, प्रफुल्ल सावंत, नागनाथ गड्डम, उमेश पवळे, आनंद चव्हाण, प्रकाश देशमुख, प्रशांत तिडके, महेंद्र पिंपळे, किशोर भवरे, भी.ना.गायकवाड, आनंद गुंडले, निखील चौधरी, अब्दुल गफार, रंगनाथ भूजबळ, शिल्पा नरवाडे, राजू काळे, मनोहर शिंदे, राजू यन्नम, सदाशिव पूरी, साहेबराव धनगे, ललिता बोकारे, प्रमोद भुरेवार, सुर्यकांत रेड्डी, प्रल्हादराव ढगे, दत्तहरी चोळाखेकर, बालाजीराव पांडागळे, आनंद भंडारे, संगीता गव्हाणे, संतोष टाकनखार, डॉ.नरेश रायेवार, विनोद कांचनगिरे, रमेश गोडबोले, राजू शेट्टे, संतोष बारसे, रघूनाथ राठोड, सुभाष राठोड, मन्नान चौधरी, विजय सोंडारे, राजेश वाघमारे, संजय सोनकांबळे, गजानन मेकाले, मुसबीर खतीब, सुभाष राठोड, साहेबराव राठोड, भीमराव जमदाडे, सुनिल अटकोरे, निळकंठ मदने, रत्नाकर शिंदे, रंगनाथ पाटील इंगोले, प्रल्हाद कदम, उध्दवराव लांडगे, भीमराव कल्याणे, प्रबुध्द बनसोडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती