नांदेड:आसना पूलाजवळ अपघात; २५ हून अधिक प्रवासी जखमी

भरधाव वेगातील ट्रक (एम. एच. २४ ए.बि. ६९७०) नांदेड मार्गे जात असताना नांदेडहून येणाऱ्या नांदेड पुसद (एम.एच.२० बी.एल.१७४०) बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसला ट्रक घासत घेऊन गेल्यामुळे बसमधील २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. प्रवास करणारे जास्तीत जास्त प्रवासी शासकीय नोकरीसाठी जात असताना अचानक हा अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, वैद्य, साळुंखे यांच्यासह अर्धापूर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी तातडीने भेट देऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रक चालक मात्र फरार झाला आहे.

या आपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे – अविनाश थावरा राठोड ( ३०, दिंडाळा.ता उमरखेड), श्रीकृष्ण श्यामराव कवडे (४५,  रा.चिंचगव्हाण, ता. हदगाव ), दयानंद मरिबा गजभारे ( ३३, रा. धनेगाव ), राजाबाई परमेश्वर जाधव(वय ५० रा.हादगाव ), तुकाराम उमला जाधव  (४८, रा केरूर. ता बिलोली), विजय विश्वान इंगोले ( ४३, रा.नांदेड ), प्रवीण भगवानराव ऐडके (३१, रा. नांदेड ), बापुराव गणपती पाटील, (५० रा. बेलखेड ता उमरखेड ), पंडित किशन नरवाडे ( ५३, रा.बदलापूर, कल्याण), संभाजी गुंडे ( रा. अंबुलगा), अशोक बाळभाऊ नालमवार (६३ रा. गजानन मंदिर नांदेड ), अभिजित अशोक नालमवार  ( ३०, गजानन मंदिर, नांदेड ), सय्यद सैदु सय्यद महेबूब ( ५२ ), कविता संतोष मुळे ( २८, रा. अरेगाव, ता पुसद), संतोष कोंडबाराव मुळे ( रा. आरेगाव, ता पुसद), नंदकिशोर विश्वनाथ महाजन (२७ रा. हदगाव ), पंकज अर्जुन पवार (२७, रा दराटी,ता. उमरखेड), रिजवानबी सय्यद शेख याकुब (२२, रा. हडसणी, ता.माहूर), भाऊराव धोंडबाराव मस्के (४२, वसंतनगर, नांदेड ), चांगुना माधवराव लहाने (४७, रा.श्रीनगर, नांदेड ), जगदीश चंद्रकांत मामीडवार (५५, रा.जैनमंदिर नांदेड ), सचिन ओमप्रकाश विगानिया (२९, रा. नाशिक ), शंकरराव गंगाराम काळे  (४०, रा. मोहनदरी, ता. उमरखेड ), काशिनाथ माधवराव चव्हाण  ( ५९,रा. हदगाव ) सर्व जखमींना नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, एस रहेमान, त्र्यंबक गायकवाड अर्धापूर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी भेट दिली.
Leave a comment