धनेगाव येथील खदीर पिता मकदुम शेख या हरवलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

0 3

नांदेड दि. 24 :- धनेगाव येथील खदीर पिता मकदुम शेख (वय 40 वर्षे) हा व्यक्ती 16 ऑक्टोंबर 2018 रोजी मित्रासोबत गाडीवर जातो म्हणून दुपारी 4 वाजेच्या सुमारास निघून गेला तो परत घरी आला नाही.या हरवलेल्या इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग सावळा, बांधा मजबुत, चेहरा गोल, केस काळे, उंची 5 फुट सहा इंच, पोशाख अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, भाषा मराठी, हिंदी, उर्दू समजते. अशा वर्णनाचा हरवलेला इसमाची माहिती मिळाल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.