धक्कादायक! दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न

0 17

बीड | दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या शिवाजीनगरमध्ये घडली आहे. धनंजय गुंदेकर असं या पत्रकाराचं नाव असून ते सायंदैनिक रिपोर्टरमध्ये सहसंपादक आहेत.

शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. धूर घरात आल्यामुळे गुंदेकर कुटुंबियांनी आगीची कल्पना आली त्यांनी आतून पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग लावणारे बाहेरुन पेट्रोल ओतत होते.पेपरमध्ये जास्त लिहितो का?, असं आग लावणारे म्हणत होते. गुंदेकर कुटुंबाने आरडाओरडा केल्यानंतर ते पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.