दोन बहिणींच्या आत्महत्येप्रकरणी युवकाला पोलीस कोठडी

0 12

नांदेड – दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरीच्या पुलावरून उडी घेऊन हस्सापूर शिवारात आत्महत्या केली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या एका तरुणाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.व्ही. शिरसाठ यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हस्सापूर शिवारातील गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून दोन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. त्यादिवशी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान मृत मुलींचे वडील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रगुप्त युवराज मोरे (२६) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार या दोघांनी पीडित बहिणींना नेहमी पाठलाग करून, फोन करून त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळूनच त्या दोघी बहिणींनी आत्महत्या केली आहे असे समोर आले. तेव्हा नांदेड ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (२९ सप्टेंबर) चंद्रगुप्त युवराज मोरेला आपल्या ताब्यात घेतले. आरोपींना पोलीस कोठडी दिली तर गुन्ह्यातील बरेच महत्वाचे मुद्दे बाहेर येतील, असा युक्तीवाद वकिलाने केला. न्या. शिरसाठ यांनी ही विनंती मान्य करत चंद्रगुप्त मोरेला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.