लालबावट्याच्या आंदोलनाला यश
नांदेड/प्रतिनिधी-शासन निर्णयानुसार ग्राम पंचायत कर्मचार्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश पंचायत समितीच्यावतीने ग्राम विकास अधिकार्यांना आज झालेल्या बैठकीत देण्यात आले आहे. थकीत वेतनासाठी निधी येवूनही अर्धे वेतन देण्यात येत होते. याला लाल बावटा प्रणित ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने ग्राम विकास अधिकार्यांना घेराव घालण्यात आला होता. शेवटी आज झालेल्या बैठकीत शासन निर्णयानुसार वेतन अदा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. नांदेड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम पंचायतीतील कर्मचार्यांचा मागील एक वर्षापासून वेतन थकीत आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले. याची दखल घेवून राज्य शासनाने महिनाभरापूर्वी ग्रा.पं. कर्मचार्यांच्या थकित वेतनासाठी निधी जिल्हा परिषदे मार्फत पंचायत समिती यांना निधी वर्ग केला. परंतु नांदेड पं.स.तील झरीतील शुक्रचार्यांना शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून अर्धे वेतन काढण्याचा निर्णय घेतला. याला लाल बावटा संघटनेने तिव्र विरोध करुन 6 महिण्याचे 100% थकित वेतन अदा करावे, अशी मागणी लावून धरली होती. यासाठी नांदेड पंचायत समिती कार्यालयाला मंगळवार दि.16 रोजी घेराव घालून सुमारे दोन तास गगणभेदी घोषणा दिल्या होत्या. यावर गटविकास अधिकार्यांनी शनिवार दि.20 ऑक्टोबर रोजी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजच्या बैठकीत शासन निर्णयानुसार वेतन अदा करण्याचे आदेश ग्राम विकास अधिकार्यांना देण्यात आले. यावेळी कॉ.के.के.जांबकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.हनमंत मगरे, कॉ.नागोराव पुयड, कॉ.रावसाहेब धोत्रे, शिवाजी शेजुळे, किशन पावडे, सुरेश ठोके, लक्ष्मण आवळे, देवानंद पाटील, वैजनाथ बरगळे, शिवराम सुर्यवंशी, पांडूरंग पावडे, माधव भिसे, आनंदा बिणेवार, रुक्माजी लांडगे यांच्यासह नांदेड तालुक्यातील ग्राम विस्तार अधिकारी बोरडे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते