एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत कपात

हैदराबाद – स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्ही स्टेट बँकेच्या एटीएममधून एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढू शकणार आहात. ३१ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.यापूर्वी एटीएममधून दिवसभरात ४० हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. मात्र, येत्या ३१ ऑक्टोबरपासून यामध्ये कपात होऊन ही मर्यादा २० हजारांवर येणार आहे. एटीएममधील फसवेगिरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बँकेचा हा निर्णय किती योग्य आणि किती अयोग्य हे सांगणे अद्याप कठीण आहे. कारण, बाजारात सद्यस्थितीला रोख स्वरुपातील रकमेचे प्रमाण आधीपेक्षा जास्त आहे.

Leave a comment