आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल

0 15

नांदेड – हदगाव-हिमायतनगरचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह ८ कार्यकर्त्यांवर पंजाब शिंदे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आमदार नागेश पाटील यांनीही पंजाब शिंदे व त्यांच्या ६ सहकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून त्यांच्याविरुद्धही हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंजाब शिंदे यांच्यासह त्याचे वडील व भाऊ अशा एकूण ६ जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यावर रविवारी हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागसेन सावळे व सहकाऱ्यांनी रविवारी उशीरा जबाब नोंदवला. या जबाबातील आरोपानुसार आमदार आष्टीकर यांनी पंजाब शिंदे यास तू २५ हजार रुपये वर्गणी दिली, असे खोटे सांगून माझी बदनामी करतोस का? असे म्हणून कृष्णा पाटील व आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विषारी औषध पाजले. तसेच शिवाजीराव देशमूख, बंडू पाटील, किशोर भोस्कर, मसरत पटेल, बजरंग भरकड व धनंजय भोस्कर यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉडने मारहाण केली, असा आरोप केल्यामुळे आमदार आष्टीकरसह एकूण ८ लोकांवर जिवे मारण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.